◾ उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे एका टेम्पोवर मोठा दगडं कोसळून टेम्पो दरीत पडला.
उत्तरेत पावसाचा हाहाकार :
दिल्ली- आज यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याचे दिसून आले. सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी 205.71 मीटर नोंदवली गेली.पाण्याच्या प्रवाह पातळी मध्ये मोठ्या प्रमाणावर सातत्याने बदल असून यांवर संबंधित विभाग लक्ष ठेवून आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लोकांना मदत शिबिरात थांबून राहण्यास सांगितले आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत येणाऱ्या काही दिवसात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.या बरोबरच हवामान खात्याने उत्तराखंडमधील हरिद्वार, मसुरी जिल्ह्यांमध्ये जोरदार अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सोनाली नदीच्या धरणाला तडा गेल्याने उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सर शहराला पुराचा धोका आहे.हिमाचलमधील पावसामुळे अयोध्येहून कुल्लूला गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जण बेपत्ता आहेत.
🔷 एकूणच देशातील हवामानाची स्थितीचा पुढील २४ तासांचा अंदाज
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल: जम्मू-काश्मीर हिमाचल, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, तेलंगणा, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक.
या राज्यांमध्ये हलका पाऊस पडेल: बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, सिक्कीम, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी येथे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.