पर्यटकांना गुजरात फिरण्यासाठी आनंदाची बातमी.

गुजरात पर्यटन-

मुंबई-भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने गुजरात फिरण्यासाठी एक नवीन रेल्वे टूर पॅकेज लॉन्च केलं आहे. हा प्रवास मुंबईहून दर शुक्रवारी सुरु होईल. या टूर पॅकेजचं नाव Kewadia With Ahmedabad Ex Mumbai ठेवण्यात आलंय.

IRCTC ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. IRCTC चे हे टूर पॅकेज 4 दिवस आणि 3 रात्रीचे असेल. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करता येईल. या पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी, अहमदाबाद आणि वडोदरा येथे जाण्याची संधी मिळणार आहे. टूर पॅकेजेसच्या ऑक्यूपेंसीच्या हिशोबाने दर बदलतील. या प्रवासाचे भाडे 15,440 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते.डेस्टिनेशन – अहमदाबाद आणि वडोदरा

पॅकेजचे नाव – केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई (WMR148) क्लास – चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार,मील प्लान – नाश्ता, रात्रीचे जेवण आणि ऑनबोर्ड मील IRCTC Tour Package: आता स्वस्तात करता येईल लडाखची सैर ! IRCTC ने आणलंय खास पॅकेज

बुकिंग कशी करायची? – IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

🔸केवडिया विथ अहमदाबाद अँड अंबाजी दर्शन एक्स मुंबई, 4 रात्री व 5 दिवस, दि 26 जुलै 2023 रुपये 18730/- सुरुवात.
🔸 केवडिया आणि हेरिटेज अहमदाबाद 4 रात्री, 5 दिवस, दि. 26 जुलै 2023 रुपये 18950/- सुरुवात.
🔸 केवडिया टूर – 3 रात्री व 4 दिवस, दि. 28 जुलै 2023 रुपये 14420/-सुरुवात.
🔸 केवडिया विथ आमदाबाद एक्स मुंबई 3 रात्री 4 दिवस. रुपये 15440/-सुरुवात.