गतिमान प्रवास:
छञपती संभाजीनगर- एमएनसीन्यूज नेटवर्क– भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागातील मनमाड – मुदखेड ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून दिनागाव-जालना दरम्यान सुमारे 7 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विभागाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या 7 किमी विद्युतीकरना मुळे मनमाड-जालना दरम्यान चे 174 किलोमीटर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला 2015-16 मध्ये 783 किलोमीटर विद्युतीकरण मंजुरी मिळाली होती.या प्रकल्पात महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. तो वेगवेगळ्या टप्प्यात राबवला जात आहे. मनमाड-धर्माबाद दरम्यान महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी अंदाजे 420 किलोमीटर आहे.
औरंगाबाद- अंकाई (मनमाड) दरम्यानचा 111 किलोमीटरचा भाग मार्च, 2022 मध्ये पूर्ण झाला आहे, तर औरंगाबाद-दिनागाव दरम्यानचा 56 किलोमीटरचा भाग मार्च, 2023 मध्ये पूर्ण झाला आहे. आता, दिनागाव-जालना दरम्यानचे 7 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे एकूण 174 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जालना परभणी मुदखेड धर्माबाद दरम्यानच्या 246 किलोमीटरच्या उर्वरित विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस विद्युतीकरण पूर्ण करण्याचे कामे प्रगतीपथावर आहेत.
रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते, आणि त्यामुळे क्षमता वाढल्यामुळे या विभागांमध्ये अधिक गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.त्याच वेळी इंधनाच्या खर्चात बचत .2023 च्या अखेरीस बीजी लाईनचे 100% विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे मधील संपूर्ण रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण प्राधान्याने केले जात आहे.
(संग्रहित छायाचित्र)