विश्वसुंदरी मानुषी चिल्लर भारतीय हिरे, रत्ने आणि दागिने उद्योगातील जीजेईपीसीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

मुंबई- एम एन सी न्यूज नेटवर्क– रमाकांत मुंडे – जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया (जीजेईपीसी) या जागतिक पातळीवर भारतीय रत्ने आणि दागिने निर्यात क्षेत्राचा प्रसार करणाऱ्या सर्वोच्च संघटनेने इंडिया इव्हनिंग (एक शानदार संध्याकाळ) कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांचे माननीय राजदूत, उच्चायुक्त, डिप्लोमॅट्स तसेच आघाडीच्या मंत्रालयांचे अधिकारी व व्यापार क्षेत्र उपस्थित राहाणार आहेत.

माननीय केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात ६० देशांचे प्रतिनिधीत्व करणारे डिप्लोमॅट्स सहभागी झाले होते. त्याशिवाय
श्री. विपुल शहा, जीजेईपीसीचे अध्यक्ष, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष श्री. किरीट भन्साळी, जीजेईपीसी मधील प्रमोशन्स व विपणन विभागाचे संयोजक श्री. मिलन चोक्सी हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
या संध्याकाळचा केंद्रबिंदू ठरली, ती मानुषी चिल्लर (मिस इंडिया वर्ल्ड २०१७, अभिनेत्री, युथ आयकॉन) यांची जीजेईपीसीच्या ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी जाहीर झालेली नियुक्ती. जागतिक पातळीवर भारतीय
हिरे, दागिने आणि रत्नांचा प्रसार करण्यासाठी करण्यात आलेल्या या नियुक्तीची घोषणा अध्यक्ष श्री.विपुल शहा यांनी केली. भारत सरकार आणि जीजेईपीसीसारखी प्रमुख संघटना यांनी एकत्रितपणे देशाच्या
विविध भागांतील सर्वोत्तम दागिन्यांच्या प्रदर्शनासाठी पावले उचलली आहेत. आपल्या देशाला हिरे, रत्ने व दागिने व्यवसायातील हस्तकारागिरीचा ५००० वर्षांचा वारसा लाभला आहे.

फॅशन शो आणि त्यातील शो स्टॉपर मानुषी चिल्लर इंडिया इव्हनिंगचे मुख्य आकर्षण ठरले. मागे रत्ने व दागिन्यांसह निर्यात वाढवण्याचा विचार आहे. या फोरममुळे नव्या संधी उपलब्ध होतील. ’
जीजेईपीसीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर श्रीमती मानुषी चिल्लर म्हणाल्या, ‘जीजेईपीसीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदी झालेली नियुक्ती माझ्यासाठी आनंददायी आहे, कारण ही संस्था दागिने व रत्ने क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर काम करत आहे. कित्येक शतकांपासून संपूर्ण जगाला भारतातील कारागिरीचे कुतूहल वाटत आले आहे.
जीजेईपीसीची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर या नात्याने मी आपल्या दागिने क्षेत्राची गुणवत्ता जगभरात मांडण्यासाठी वचनबद्ध आहे. दागिने हा आपला वारसा, संस्कृती, भावना, परस्परांमधील नाते आणि अविस्मरणीय
आठवणींचे प्रतिबिंब आहे. या उद्योगाचे वैशिष्ट्य असलेली कारागिरी, सर्जनशीलता, गुणवत्तापूर्ण डिझाइन यांचा प्रसार करण्यासाठी मी उत्सुक आहे.’