असह्य उन्हाच्या झळा, आला उन्हाळा.

असह्य उन्हाच्या झळा, आला उन्हाळा.

परळी/प्रतिनिधी-

या वर्षी उन्हाळा यंदा अधिकच तापायला लागला आहे. सध्या परळी शहरात कमाल तापमानात गतवर्षेपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन ते चार सेल्सिअस तापमान अधिक असल्याचे फेब्रुवारी च्या मध्यापासूनच जाणवायला लागले आहे. फेब्रुवारी चा शेवटचा आठवडा चालू असतानाच अंगाची लाही लाही करणारे ऊन जाणवत आहे. हवामान खात्याने सुद्धा यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असल्याचे संकेत काही दिवसापूर्वीच दिले आहेत.

दरम्यान दिवसा कमाल तापमान 35 डिग्री पर्यंत गेल्याचे दिसून येत असून रात्रीचे तापमान अद्यापही 16 ते 18 सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत असून सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यानच उन्हाचा कडाका सुद्धा जाणवत आहे. उन्हाळा यंदा लवकरच सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी ही महत्त्वाची आहे. वाढत्या तापमामुळे आणि फेब्रुवारीतच वाढलेल्या उन्हामुळे में आणि जून महिन्यात उन्हाची काय स्थिती असेल याचा अंदाज आत्ताच लोक वर्तुउ लागले आहेत. मे महिन्यात जाणवणारी उन्हाची तीव्रता आता फेब्रुवारी मध्येच जाणू लागले आहे. दुपारी ११ च्या नंतर रस्त्यावर निघणं सुद्धा दुरापस्त होत असून रस्ते सुद्धा निर्मनुष्य होत आहेत.

शहरातील वाढत्या उन्हामुळे सध्या सुरु असलेल्या जत्रेत दिवसा कोणी दिसेनासे झाले आहे. मात्र रात्रीच्या वेळी नागरिकांची गर्दी वाढतें आहे.

……………………………………………..

◾दाहक उन्हाची कारणे

यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच मे महिन्यात असल्या प्रमाणें उन्ह जाणवतं आहे. पश्चिम दिशे कडून येणाऱ्या वाऱ्याचा विशेष प्रभाव नसल्याने आणि बर्फ वृष्टी होणाऱ्या उंच डोंगराळ भागात कमी प्रमाणात झालेली बर्फ वृष्टी मैदानी भागातील उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात येते आहे.