गुरुकृपा संगीत विद्यालयाला परिक्षा केंद्र म्हणून मान्यता

परळी/एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी येथील गुरूकृपा संगीत विद्यालयास अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने विशारद पुर्ण पर्यंतच्या एप्रिल व मे तसेच नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही सत्रासाठी नोव्हेंबर २०२३ पासून परिक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे.

परळी व परिसरातील संगीत साधना व प्रशिक्षणाचे काम गुरूकृपा संगीत विद्यालय मागील अनेक वर्षापासून अनेक गायक व संगीतकार गुरूकृपा संगीत विद्यालयातून घडले आहेत. मंडळाने गुरूकृपा संगीत विद्यालयास विशारद पूर्ण पर्यंतचे परिक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली असून याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.