कोल्हापूर/काळम्मावाडी -एम एन सी न्यूज नेटवर्क: राधानगरी धरण ९१ टक्के भरले असून, येत्या एक ते दोन दिवसांत धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे.राधानगरी धरण क्षेत्रात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सतत चालू असलेल्या पावसाने राधानगरी धरण सुमारें ९०.७८ टक्के भरले आहे.
सोमवारी धरण आले. परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. राधानगरी धरणाची पातळी ३४३.३८ फूट, तर पाणीसाठा ७५९१.०८ दशलक्ष घनफूट आहे. बीओटी पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एक ते दोन दिवसांत धरण भरून स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे खात्याकडून कळविण्यात आले आहे.