पंचगंगा ने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर साठी ईशारा.

🔷 कोल्हापूरला येऊन मिळणारे अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग बंद
उद्या 26 जुलै पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट.

कोल्हापूर- जिल्ह्यात पाच सहा दिवसांत सतत कोसळणाऱ्या पावस सोमवारी थोडासा कमी झाला मंगळवारी सकाळीही शहर आणि परिसरात पावसाची कमी अधिक प्रमाणात रिमझिम सुरू आहेच. त्यामुळे पाउस जरी कमी झाला सतत च्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ मात्र सुरूच आहे. पंचगंगेने सोमवारी पहाटे इशारा पातळी ओलांडली.

घाट माथ्यावर होत असलेल्या पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. दरम्यान कालपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर असली तरी कोल्हापूर जिल्ह्याला अद्यापही पूढचे 24 तास महत्वाचे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उद्या 26 जुलै पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पाणीपातळीत एक फुटाची वाढ झाली असून, नदीची वाटचाल आता 43 फुटांच्या धोका पातळीकडे सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी येणाऱ्या ज्या त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. दरम्यान, आतापर्यंत 83 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.