ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यलयास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची सदिच्छा भेट

वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह सहकाऱ्यांनी केले स्वागत

परळी/एम एन सी न्यूज नेटवर्क (दि. 25) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने बीड जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी परळी शहरात आले असता कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी श्री सूरज चव्हाण यांचा परळी नगरीत स्वागतपर सत्कार नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांनी केला, यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वरआबा चव्हाण,युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर,तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअण्णा टाक,युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड,सामाजिक न्याय आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावंत,ज्येष्ठ नेते विलास बापू सोनवणे,माजी नगरसेवक राजेंद्र सोनी,युवक नेते बळीराम नागरगोजे,तक्की खान,अमित केंद्रे,गणेश सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.