देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका ३० मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार यांची प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ६ जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायवृंदाने न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.