आनंदाची बातमी! मुंबईतून धावू शकते पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper Train :
मुंबई: भारतीय रेल्वेनं प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी 2019 वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी सुरू केली. वंदे भारतमधून प्रवास करताना आता थकवाही जाणवणार नाही कारण वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या दिमतीला हजर होत आहे.  देशातील पहिली स्लीपर व्हर्जन वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावू शकते.

देशातील पहिली स्लीपर व्हर्जन वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावू शकते. पुढील चार वर्षांत रेल्वेला देशभरात एकूण 400 वंदे भारत ट्रेन सुरू करायच्या आहेत.या ट्रेनचा ‘प्रोटोटाइप’ हा इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) येथे तयार केला जातोय. आयसीएफ कंपनीला 86 वंदे भारत ट्रेन बनवण्याचं कंत्राट दिलं होतं, त्यापैकी 9 ट्रेन स्लीपर व्हर्जनच्या आहेत. स्लीपर व्हर्जनचा प्रोटोटाइप लवकरच पूर्ण होईल. या शिवाय यामध्ये वंदे भारत सीटिंग व्हर्जन, वंदे भारत स्लीपर व्हर्जन आणि वंदे भारत मेट्रो व्हर्जन ट्रेनचा समावेश आहे. या गाड्या राजधानीसह विविध मार्गावर धावतील. तर, दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई-दिल्ली मार्गावर धावू शकते