Pc IRCTC Help
अतिवृष्टीचा तडाखा- कांदिवलीत १३३ मिमी, दहिसरमध्ये १८५ मिमी आणि बोरिवलीत १४४ मिमी पावसाची नोंद. मुंबई सह ठाणे, पालघर येथील महाविद्यालय, शाळांना सुटी. रुळांवर पाणी आल्याने लोकलही अर्धा ते एक तास उशिरा
मुंबई :-मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आणि चर्चगेटसह मरीन लाईन्स, चर्नी रोड रेल्वेमार्गालगत गिरगाव, ग्रँट रोड, परळ, सायन पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरिवली, मालाड ते पूर्व उपनगरांत कुर्ला, भांडुप, गोवंडी व अन्य उपनगरे दिवसभर अक्षरश: पाण्यात डुंबली. मुंबईची डुंबई झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोलमडली, रस्ते बंद करावे लागले आणि रुळांवर पाणी आल्याने लोकलही अर्धा ते एक तास उशिरा धावू लागल्या. संध्याकाळी सहापर्यंत अवघ्या नऊ तासांत मुंबईची अनेक उपनगरे या अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली. झाली.
शुक्रवारीही पावसाचा रेड अलर्ट असल्याने मुंबई, ठाण्यासह महामुंबई प्रदेशातील शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे मिळालेली ही सलग दुसरी सुट्टी असेल.
अधिवेशनाला चार दिवसांची सुट्टी
मुसळधार पावसाने राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे विधिमंडळाच्या अधिवेशनाला चार दिवस सुट्टी देण्यात आली असून, या सुट्टीत आमदार आपापल्या मतदारसंघांत जाणार आहेत. या चार दिवसांत आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील नुकसानीचा आढावा वेणार आहेत. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असे चार दिवस अधिवेशन होणार नाही. पुढील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिवेशन होईल.
ठाणे पालघरमध्ये तर गुरुवारी पावसाने कहर केला.
दुपारी तीन तासांत ६८ मिमी पाऊस पडल्याने घोडबंदर होत्या. रोडवर तर महापूर आला आणि पातळीपाडा, चेना ब्रिज, काजूपाडा, डीमार्ट परिसराला नदीचे स्वरूप आले. पुराचे पाणी रुळांवर गेल्याने उपनगरी रेल्वे बदलापूर ते अंबरनाथ आणि कल्याणदरम्यान लोकल उशिराने धावत होत्या. पालघर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून कवडास, वांद्री ही धरणेही भरून वाहतं आहेत. या मुसळधार पावसाच्या तडाख्यात मुंबई-अहमदाबाद रस्ते मार्गावर दहिसर ते नायगावपर्यंत वारा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या
रायगडच्या नद्या इशारा पातळीवर- अलिबाग, कर्जत, रोहा, खालापूर, पेण, मुरूड, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन अशा बारा तालुक्यांतील २१५७ कुटुंबांतील ७ हजार ४६९ नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.
रायगड : दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, सावित्री आणि उल्हास नद्यांना देखील पूर आला आहे. परिणामी, नदीकाठच्या आणि खाडी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.