‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पहिला पुरस्कार रतन टाटांना

मुंबई :- ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पुरस्कार स्थापन केला आहे. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना हा पहिलाच पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला पलना देण्याच्या दृष्टीने, उद्योगांना सर्व मंजुन्या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते.