संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, किशोर कदम

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातून तीव्रपणे पडसाद उमटत असून कलावंत ही आपल्या भावना, मतं व्यक्त करत आहेत. ‘शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’चे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. भिडे यांच्या विरोधात सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष देखील रस्त्यावर उतरले आहेत. काही कलाकारांनी देखील संभाजी भिडे यांच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. यात कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

कवी किशोर कदम यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,

अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणे हा राजकारणाचा भाग आहे.

आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

तसे नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करत आहे,’