चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार चौघांचा मृत्यू

मुंबई/दहिसर : जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका पोलिसानेच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहेत. मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या या पोलिसाच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पालघर आणि मुंबई दरम्यान दहिसरमध्ये घडली. कोणाला काहीही न समजण्या आधीच या पोलिसाने धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्यात एकूण चार जणांना गोळी लागली असून,  तीन प्रवाशांचा आणि मृत्यू एक एएसआय झाला आहे. गोळीबार करणाऱ्या पोलीस हवालदाराला मीरा रोडजवळ पकडण्यात आले असून, तो मानसिक तणावाने त्रस्त असल्याचे पोलिसांनी सां​गितले. दरम्यान, गोळीबार करण्यामागे संशयिताचा काय हेतू होता, त्याने ही गोळी का चालवली हे समजू शकलेले नाही. याबाबत पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाब नोंदवत आहेत. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. गोळीबार करून त्याने दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली, असे निवेदनात म्हटले आहे.