नांदेड / एम एन सी न्यूज नेटवर्क-शीख धर्माची दक्षिण काशी आणि महत्त्व पूर्ण तीर्थक्षेत्र असलेल्या नांदेड शहरातुन दररोज हजारो यात्रेकरू ये-जा करतात मात्र श्री गुरूगोविंदसिंघजी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विमान तळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची (नाईट लॅडिंग) आणि जम्बो विमान उतरण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असताना देखील नांदेडच्या विमानतळावरुन सध्या एकही विमानाचे उडाण होत नाही. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या आणि परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, बीड़ या जिल्ह्यापासून १०० किलो मीटरचे अंतरावर असलेल्या नांदेड विमानतळावरुन नांदेड ते मुंबई, पुणे, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीस यश आले आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी १६ मार्च रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे विमानतळावरुन नांदेड ते मुंबई, पुणे, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व पदाधिकाऱ्यांना केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील नांदेड येथून मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनुकुलता दर्शवली आहे..
खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश-कोविडनंतर नांदेड विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. व्यवस्थापनाचे काम देखील रिलायन्स समुहाकडे असल्याने या ठिकाणी केवळ खासगी विमान सेवा सुरु आहे. नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. विमानसेवा अधिकाधिक दर्जेदार व्हावे आणि नांदेडकरांना मुंबई, पुणे, दिल्ली येथे तातडीने पोहोचता यावे. विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे ते त्रस्त आहेत. परंतु लवकरच नांदेडला गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आणि शिक्षणासाठी पुणे, मुंबई, दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परवड थांबणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितेल. असून, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांचे आभार मानले
