धनंजय मुंडे यांनी केले जोशी कुटुंबाचे सांत्वन

अंबाजोगाई/एम एन सी न्यूज नेटवर्क-राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई येथे दिवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांचे निधनाने परळीच्या पत्रकारितेची मोठी हानी झाली असून त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे, या दुःखात आपण जोशी परिवारासोबत असल्याचे भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. वेळ त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित होते.