मुंबई:/ कर्जत /एनडी स्टुडिओ -सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर येताच सिनेसृष्टीसह सर्वच क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. नितीन देसाई हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच मालिका व नाटकांसाठी भव्य असे सेट उभारण्यासाठी प्रसिद्ध होते.
नितीन देसाई यांनी त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानी आत्महत्या केल्याने चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मिती क्षेत्रांत मोठी खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयुष्य गळफास घेऊन ‘आयुष्य संपवलं. त्यांच्या या निधनाने राजकीय तसेच कलाक्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नितीन देसाई यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल कशी राहिली याविषयी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात प्रवास उलघडला होता. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली भेट आणि त्यांनी माझ्या कामाचे केलेले कौतुक माझ्यासाठी किती प्रेरणादायी असल्याचे सांगितले होते.