जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना शोकसभेतून श्रध्दांजली; अनेकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

संवेदनशिल मनाचे चतुरस्त्र व्यक्तीमत्व जाण्याने पत्रकारीता क्षेत्राचे मोठे नुकसान
परळी /एम एन सी न्यूज नेटवर्क- मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचे दि.३० जून रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारीतेबरोबरच परळीच्या पत्रकारीतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतीक, धार्मीक आणि शैक्षणीक क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. अशा व्यक्तीमत्वाच्या जाण्यामुळे परळीच्या सांस्कृतीक क्षेत्राची खूप मोठी हाणी झाली असून, ती कशानेच भरून निघणार नाही अशा शोकभावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आल्या. बुधवार, दि.०२ जुलै रोजी परळीच्या औद्योगीक वसाहत सभागृह येथे पत्रकार प्रशांत जोशी यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, साहीत्य, कला, क्रिडा, पत्रकारीता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांच्या निधनाने संपूर्ण पत्रकारीता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. परळीत घेण्यात आलेल्या शोकसभेच्या सुरूवातीस पत्रकार स्व.प्रशांत जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांकडून दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी प्रशांत जोशी यांच्याप्रतिच्या शोकभावना व्यक्त केल्या. मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांचे पत्रकारीतेतील सत्यविचार, परखडपणा त्याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक या नात्याने स्व.प्रशांत जोशी यांनी पुढे नेण्याचे सतत्यपूर्ण कार्य केले. त्यांचा विविध क्षेत्रातील अनेकांशी दांडगा लोकसंपर्क होता. अतिशय मनमिळावू आणि कायम सकारात्मक असलेल्या या व्यक्तीमत्वाच्या कार्यकर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. मागील कित्येक वर्षांपासून त्यांनी पत्रकारीता क्षेत्रात मोठे योगदान दिले असून, विविध सामाजिक प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली. साहीत्य व कलेप्रतीची त्यांची असलेली आवड सर्वश्रुत आहे. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ या स्व.प्रशांत जोशी यांना आपला मानसपुत्र मानायच्या.
प्रशांत जोशी हे व्यक्तीमत्व त्यांच्या लेखणीतून आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांच्या व्यासपिठांच्या माध्यमातून लोकपरिचयाचे झाले होते. पत्रकारीतेतून हजारोंशी प्रशांत जोशी यांचा स्नेह जोडला गेला होता. त्यांच्या जुन्या आठवणी आठवून अनेकांनी असा पत्रकार परळी शहरात होणे नाही… अशा भावना व्यक्त केल्या.
प्रशांत जोशी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक पत्रकारांनी स्वतःची वर्तमानपत्रे काढली. ते संपादक झाले. परंतु कामाप्रती निष्ठा असल्याने प्रशांत जोशी यांनी आपला संपूर्ण वेळ दैनिक मराठवाडा साथी या वृत्तपत्रासाठी दिला. व्यावसायिक पत्रकारिता झाली असली तरी प्रशांत जोशी यांनी कधीही जाहिरातीसाठी फारसा आग्रह लावून धरला नाही. हेही तेवढेच खरे. प्रशांत जोशी यांचे सूत्रसंचालन बहारदार व अभ्यासपूर्ण होते. कुठलाही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार व्हावा ही भावना यजमानां एवढीच त्यांची असायची. एवढी प्रासंगिकता कोणत्याही पत्रकारात सहसा नसते. त्यामुळे यजमानांच्या स्वागत सत्कारा बद्दल फारसं लक्ष देण्याची आयोजकाला गरज पडत नव्हती. एवढं बारीक निरीक्षण त्यांचं त्या कार्यक्रमात असायचं. प्रशांत जोशी अत्यंत अभ्यासू, समयसूचक दांडगा जनसंपर्क व कामाप्रती निष्ठा असलेले एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.
या शोक सभेस माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी,दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी माजी नगराध्यक्ष सरोजिनीताई सोमनाथ आप्पा हालगे, वैद्यनाथ देवल कमिटीचे माजी सचिव राजेश देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामातीताई गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, ज्येष्ठ पत्रकार जी.एस. सौंदळे, मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी,डॉ. शालिनीताई कराड, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव दत्ताप्पा इटके गुरुजी,भाजपाचे युवा नेते राजेश गिते, कॉम्रेड प्रभाकर नागरगोजे,विजय सामत,तुळशीराम पवार, दत्तात्रय कुलकर्णी, नारायण सातपुते, अभयकुमार ठक्कर,सुरेश आण्णा टाक, व्यापक शांती लाहोटी,प्रा. दासू वाघमारे ,प्रा विनोद जगतकर,अतुल दुबे, प्रा. मधुकर आघाव, प्रा. पवन मुंडे प्रा.नयनकुमार आचार्य, अॅड.जीवनराव देशमुख, अॅड.अरुण पाठक, मनोज संकाये, अँड. अतुल तांदळे, प्रा राजकुमार यल्लावाड, अरुण अर्धापुरे, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, संपादक आत्मलिंग शेटे, प्रकाश सूर्यकर, राजेश साबणे ज्ञानोबा सुरवसे, बालकिशन सोनी, बालासाहेब फड, रानबा गायकवाड, मोहन व्हावळे, शिवसेनेचे वैजनाथ माने, माजी नगरसेवक राजेभाऊ दहिवाळ, प्रा.नयनकुमार विशारद, नितीन समशेट्टे, कमलाकर हरेगावकर, अश्विन मोगरकर, डॉ.शिवकांत आंदुरे, संजय शेवलकर, बालचंद लोढा, विजयसेठ सामत, शेखर स्वामी, वैजनाथ कळसकर, आनंत इंगळे, शिक्षक नेते बंडू आघाव, गायक कृष्णा बळवंत, कैलास तांदळे, भोजराज पालीवाल, संजय सेवलकर, बालकिशन लोढा, रतन कोठारी, दिलीप जोशी, जयप्रकाश बियाणी, सतीश सारडा, अशोक जाजू सतीश बंग, मुरलीधर बंग, सरपंच गोवर्धन कांदे, अनिस अग्रवाल, सुभाष वाघमारे, ॲड.संजय रोडे, इंजिनीयर भगवान साकसमुद्रे, संपादक नितीन ढाकणे, दीपक गीते, पत्रकार संभाजी मुंडे, दत्तात्रय काळे, अभिमन्यू फड, स्वानंद पाटील, अनिरुद्ध जोशी, श्रीराम लांडगे, सुकेशनी नाईकवाडे, संजीव रॉय, धीरज जंगले,धनंजय आढाव, जगदीश शिंदे,कैलास डुमणे,बालाजी ढगे,संतोष जुजगर, अनिल गायकवाड, आनंद हाडबे, सचिन स्वामी, नरसिंग आनंदास, अजय पुजारी,पद्माकर मुजमुले, आनंदतूपसमुद्रे, संतोष बारटक्के, जगन्नाथ रामदासी, महेश शिवगण, करण, शुभम चव्हाण त्यांची उपस्थिती होती. तर फोनद्वारे प्रकाश सामत, कॉ.अजय बुरांडे, डॉ.संतोष मुंडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. शोकसभेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले.