एस.एम.देशमुख यांनी जोशी कुटुंबाची घेतली भेट

बीड/ अंबाजोगाई/एम एन सी न्यूज नेटवर्क- ज्येष्ठ पत्रकार प्रशांत प्रभाकरराव जोशी यांचं दुःखद निधन झाले आहे.अंबेजोगाई येथे जाऊन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी जोशी कुटुंबाची नुकतीच भेट घेतली.भेटी दरम्यान कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करुन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांच्या हस्ते जोशी परिवारास आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक सुभाष चौरे,जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,उपाध्यक्ष रवी उबाळे, संपादक विलास डोळसे,बीड जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्तात्रय अंबेकर,जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत सह आदींची उपस्थिती होती.