पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉनफ्रंसद्वारे उदघाटन

 

रविवारी सकाळी 11 वा. ऑनलाईन (व्हिडिओ कॉनफ्रंसद्वारे )     अमृत भारत स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन.

परळी वैजनाथ: अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश झाल्याने परळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 13 कोटी पाच लाख 39 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .या निधीतून परळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात परळी सह 16 रेल्वे स्टेशनचा अमृतभारत स्टेशन योजनेमध्ये समावेश केला आहे.

रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मंत्रालयाने अमृतभारत स्टेशन योजना जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन (व्हिडिओ कॉनफ्रंसद्वारे )अमृत भारत स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे . परळी येथील रेल्वे स्टेशनचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. येथील रेल्वे स्टेशन वर सहा ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमास बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे रेल्वे प्रबंधक भरतेश कुमार जैन यांनी एका पत्राद्वारे दिली आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये हैदराबाद, काझीपेठ, बिदर, जहिराबाद, परळी वैजनाथ, तांडूर, करीमनगर सह 16 रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसर सुशोभीकरण प्रतीक्षागृह उभारणे -सुधारणा ,स्वच्छता गृहामध्ये सुधारणा व व अन्य विकास कामे करून रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यात येणार आहे.