परिवर्तनाच्या क्रांतीची परळीतून होणार सुरुवात…ॲड.माधव जाधव

शेतकरी संघटनेच्या नेतेमंडळींचा बी आर एस पक्षातर्फे परळी मध्ये स्वागत….
अनेक युवकांचा बी आर एस पक्षांमध्ये परळी मध्ये प्रवेश….

परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- भारत राष्ट्र समितीच्या सभासद नोंदणी अभियानामध्ये अनेक तरुण व युवकांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे.परळी शहरातील अनेक युवकांनी भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये परळी विधानसभा प्रमुख ॲड. माधव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी परळी विधानसभा भारत राष्ट्र समितीतर्फे शेतकरी संघटनेने नुकताच भारत राष्ट्र समितीला पाठिंबा दिल्यामुळे शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कालिदासरावजी आपेट साहेब तसेच बीड जिल्हा अध्यक्ष अनुरथ भाऊ काशीद,राधाकिशन गडदे, लखन होके,तानाजीराव कदम यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा सहसमन्वयक कुलदीप भाऊ करपे,श्रीकृष्ण दादा चाटे,भगवानराव वांगे, कमलाकर बावणे, हरीदास आपेट सर, दत्ता भाऊ साळुंखे,गणेश भैय्या जाधव,सिकंदर भाई व भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.हा कार्यक्रम परळी येथील भारत राष्ट्र समितीचे संपर्क कार्यालय माधव भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिदासराव आपेट हे होते. महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये सत्ता परिवर्तन करून शेतकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी भारत राष्ट्रसमितीला साथ देण्याची साद कालिदास राव आपेट यांनी यावेळी घातली.तसेच तरुणांनी न भिता भारत राष्ट्र समितीमध्ये सामील होऊन देशांमध्ये परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात परळी मधून होणार असून त्यासाठी न भिता सर्वांनी भारत राष्ट्र समितीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ॲड. माधव जाधव यांनी केले.तसेच भारत राष्ट्र समितीचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांच्या हिताचा अजेंडा संपूर्ण भारत देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये राबविण्यासाठी के चंद्रशेखर रावसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी भारत राष्ट्र समितीमध्ये सहभागी होऊन येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन बीड जिल्हा सहसमन्वयक कुलदीप भाऊ करपे यांनी केले. यावेळी यावेळी कमलाकर भैया बावणे तसेच दत्ताभाऊ साळुंखे गणेश जाधव सिकंदर भाई श्रीकृष्ण दादा चाटे यांनी सुद्धा आपली मनोगत व्यक्त केली.