तिरुपती बालाजीला 5 कोटींचे दान

नऊ भाविकांनी मिळून रकमेचा दिला डीडी

तिरुपती : – तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या विस्तारासाठी राज्यातीलच ९ भक्तांनी मिळून तब्बल ५ कोटी रुपयांचे दान दिले असून या मंदिराच्या विस्तारासाठी जमीन खरेदी करण्यासाठी या लोकांनी सोमवारी तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे (टीटीडी) ही रक्कम सुपूर्द केली.

तामिळनाडू टी.टी.डी. चे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष शेखर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दानदात्यांच्या प्रतिनिधीमंडळाने अन्नमय्या भवन मंदिर विभागाचे अध्यक्ष वाय बी सुब्बा रेड्डी यांच्याकडे डीडी सुपूर्द केला.
चेन्नई शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण टी. नगरमधील वेंकटनारायण रोडवर श्री वेंकटेश्वर स्वामींचे मंदिर आहे. या मंदिराचा विस्तार करण्यासाठी प्रस्तावीत जमीन खरेदीसाठी दानकर्त्यांनी पाच कोटी रुपये दान केले. मंदिराच्या विस्तारासाठी एलएसीने बाजूची ३५ कोटी रुपयांची जमीन चिन्हीत केली आहे. हा भूखंड खरेदी करण्यासाठी यापूर्वी काही दानकर्त्यांनी ८ कोटी रुपये दिले आहेत.
तिरुपती तिरूमला देवस्थानम (टी.टी.डी.) ही तिरुपती येथील प्रसिद्ध बालाजी (श्री वेंकटेश्वर स्वामी) मंदिराची विश्वस्त आहे.