वाईत न्यायालयाचे कामकाज सुरू असतानाची घटना ॥ आरोपीला जागेवरच पकडले
सातारा/ वाई– सातारा जिल्ह्यातील मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले कुख्यात गुंड अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुई), निखिल मोरे, अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्यावर सोमवारी वाई न्यायालयात गोळीबार झाला. दोन वेळा गोळीबार ची घटना होऊन ही कोणाला दुखापत झाली नाही.
पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास जागेवरच ताब्यांत घेतले. गोळीबार करणारे संशयित वकिलाच्या वेशात आले होते दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडल्याने एकूणच पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा मात्र न्यायालय परिसरात होत होती.