भोजनात १० प्रकारांच्या पदार्थांचा असेल समावेश
🔷 संसदेत मांडले विधेयक
नवी दिल्ली/ विवाह समारंभ हा धन दाडग्यासाठी मोठा इव्हेंट असला तरी मध्यमवर्गीयांसाठी एकूणच जीवनात कमावलेल्या एकूण रकमेच्या पैकी महत्त्व पूर्ण खर्च करावयाची रक्कम असते. पंजाबमधील खादूर साहिब येथील काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत शुक्रवारी खाजगी सदस्य विधेयक या सादर केले आहे. या विधेयकामुळे विवाह सोहळ्यांमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
विवाह सोहळ्यात १० पेक्षा जास्त पदार्थ दिले जाऊ शकत नाहीत. याशिवाय २,५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम शगुन किंवा भेट म्हणून देता येणार नाही.
हे विधेयक का आणले? विधेयकाचा उद्देश विवाहांमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालणे हा आहे. तसेच या विधेयकाच्या माध्यमातून विवाह सोहळ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे; जेणेकरून समारंभाच्या अनावश्यक खर्चाला आळा बसेल या विधेयकानुसार विवाह सोहळ्यात केवळ ५० पाहुणेच सहभागी होऊ शकतील.
(वृत्तसंस्था)