ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे /दि. 9 ऑगस्ट – ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचं मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.त्यांनी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार आपल्यावर चुकीचे उपचार होत असल्याचे त्यांनी आपले मित्र संजय सोनवणी यांना 22 जून रोजी पाठवलेल्या मेसेज मधून कळविले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. हरी रामचंद्र नरके असे त्यांचे पूर्ण नाव असून एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी त्यांची ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.

प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.