अपंग बांधवांनी मानले साश्रू नयनांनी राधा- मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशन पुणे यांचे आभार!
परळी/एम एन सी न्यूज नेटवर्क:- परळी येथील औद्योगिक वसाहत सभागृहात राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्टिफिशियल लिंब कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी मोफत हात पाय कृत्रिम अवयवाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अनेक अपंग बांधवांना मोफत कृत्रिम हात पाय मिळाल्याने ते अक्षरशा भारावून गेले होते. अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. “कृत्रिम अवयव” वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरम्यान या शिबिरात शेकडो दिव्यांग बांधवांना हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन दिप प्रज्वलन करून तसेच संपादक स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा तथा राधा-मोहन साथी प्रतिष्ठांच्या मार्गदर्शिका राधाबाई मोहनलाल बियाणी, राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, प्राचार्य सचिन धूत, युवा उद्योजक लोकेशजी राठी,अभिषेकजी झंवर, सौ.छाया सचिन धूत, सौ.कल्पना चंदुलाल बियाणी, साधू वासवानी मिशन पुणे प्रोजेक्ट हेड मिलिंद जाधव, टेक्निशियन सुशील ढगे, सलील जैन, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र राठोड, दत्तात्रेय राक्षे, संपादक सतीश बियाणी, संपादक आत्मलिंग शेटे पत्रकार जगदीश शिंदे, कार्यकारी संपादक तथा राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे संचालक ओमप्रकाश बुरांडे,जयप्रकाश बियाणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय विकत घेणे शक्य होत नाही ही बाब लक्षात घेत राधा मोहन साठी प्रतिष्ठान परळी व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑगस्ट 2023 रोजी मोफत कृत्रिम हात-पाय, कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या 70 लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून हात-पायांचे माप घेण्यात आली होती. दुर्घटनेत हात-पाय गमावणारे, मधुमेहाने त्रस्त, रक्तवाहिनींच्या विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरीन झालेल्या व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगण्यात असमर्थ असतात. अशा व्यक्ती कृत्रिम हात-पायांच्या सहाय्याने सामान्य जीवन जगू शकतात. सर्वसामान्यांप्रमाणे चालू फिरू शकतात. सर्व कामकाज करू शकतात. एवढेच नव्हेतर सायकल, रिक्षा चालवू शकतात. राधा- मोहन साथी प्रतिष्ठान च्या पुढाकाराने चंदुलाल बियाणी यांच्या बियाणी यांच्या प्रयत्नाने या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळाली असून शेकडो अपंग बांधवांना दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ गडेकर, अनंत ढोपरे,शरद कावरे, प्रकाश वर्मा, मुरलीधर बंग, आनंद तूपसमुद्रे, आनंद हाडबे, जगन्नाथ रामदासी आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले.
साधू वासवानी व राधा मोहन साथी प्रतिष्ठानचा पुढाकार
वेगवेगळ्या अपघातांत हात किंवा पाय गमावलेल्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागविण्याचे काम राधा- मोहन साथी प्रतिष्ठान परळी व साधू वासवानी मिशन पुणे हे करीत आहेत. दिव्यांगांना आधार देण्यासाठी कृत्रिम अवयव व सहायक साधने देण्यासाठी बियाणी मित्र परिवार व साधू वासवाणी मिशन यांनी पुढाकार घेतला आहे. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो दिव्यांग गरजूंची तपासणी करून मोठ्या प्रमाणात साहित्य देण्याचे लक्ष हाती घेण्यात आले होते.
दिव्यांग व्यक्तींना जगण्यासाठी उभारी मिळेल-चंदुलाल बियाणी
राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या माध्यमातून शेकडो अपंग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसविण्यात आले असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना निश्चितच जगण्यासाठी नवी उभारी मिळेल. आर्टिफिशल लिंब कॅम्प यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आयोजित करून अपंग बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करणार असल्याचे राधा
दिव्यांग बांधवांना दिलासा
मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबिर आयोजित केल्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अद्यावत तंत्रज्ञानाने बनविलेले कृत्रिम हात व पाय फायबरचे असून वजनास अत्यंत हलके टिकावू व मजबूत असून प्रत्यारोपण केल्यानंतर अपंग व्यक्ती चालू शकते तसेच सर्व दैनंदिन कामे करू शकते. सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्री रूग्णांचे मधुमेहामुळे, गेंगरीनमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे हात व पाय गमावले गेले असतील अशा सर्व रुग्णांची तपासणी करून त्या सर्व दिव्यांग बांधवांना मोफत हात पाय बसविण्यात आले असून शेकडो दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला.
असंख्य दिव्यांग बांधव शिबिरात सहभागी
राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत हात पाय अवयव शिबिरास बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून असंख्य अपंग बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती.यात लोणार जिल्हा बुलढाणा, उमरगा, लातूर,औराद शहाजानी,बार्शी, लोहा,वाशी, भूम, परंडा,गंगाखेड जालना परभणी औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, आंबेजोगाई आधी परिसरातील दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला.
—————————————————————————————
शेतातील पिकांचे खळे सुरू असताना मळणी यंत्रात माझा हात मला गमवावा लागला होता. हात पूर्णता निकामी झाल्याने अनेक अडचणीचा सामना मला करावा लागत होता. शिबिरात मला कृत्रिम हात मिळाला असून यामुळे वाऱ्यावर उडणारी माझ्या शर्टची बाही वारंवार मला दुःख देत होती. पण आज मिळालेल्या हातामुळे मला नवचैतन्य मिळाले आहे.
पंढरी भाऊराव सानप
लोणार ,जिल्हा बुलढाणा