मेघाश्रेय फाउंडेशनतर्फे ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई पोलिसांना हेल्मेट आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई/ वांद्रे-एम एन सी न्यूज नेटवर्क- रमाकांत मुंडे
मेघाश्रेय फाऊंडेशनतर्फे ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्टर रोड, वांद्रे येथे झालेल्या या कार्यक्रमाला सीमा सिंग, मेघश्री फाउंडेशन, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेता दिनो मारिया, चित्रपट दिग्दर्शक शशांक खेतान यांच्यासह मुंबई पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीमा सिंग यांनी मुंबई पोलिसांना हेल्मेट आणि छत्र्यांचे वाटपही केले. या कार्यक्रमात 500 हून अधिक मुले तसेच ब्रदरहुड बाइकर्सची टीम सहभागी झाली होती. यावेळी अनेक मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
यावेळी बोलताना सीमा सिंग, मेघाश्रेय फाऊंडेशन म्हणाल्या, “स्वातंत्र्य दिनानिमित्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या आणि वंचितांच्या कल्याणासाठी मुंबई पोलिसांना सन्मान आणि सहकार्य करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो.