खुन प्रकरणातील दूसरा आरोपी ताब्यात

परळी /एम एन सी न्यूज नेटवर्क:– खून प्रकरणातील फरार आरोपी दादरमधून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि भार्गव सपकाळ यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना या आरोपीला दादर पोलीसांच्या सहकार्याने पकडण्याची कामगिरी बजावली आहे.

परळी शहर पोलीस ठाण्यात कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२३ कलम ३०२,३४, आय.पी.सी. अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ करत आहेत. तांत्रिक तपासा दरम्यान पाहिजे असलेला आरोपी महेश नामदेव रोडे याचे दादर परिसरामध्ये लोकेशन दिसून येत होते. एपीआय सपकाळ यांना दि. १३ रोजी ११:४५ वाजता एन. सी. केळकर रोडवर हनुमान मंदिर जवळ पाहिजे आरोपीत हा त्याच्या एका मित्रासोबत अचानक दिसून आला. तसेच ते दोघे सदर ठिकाणाहून निघून जाण्याच्या तयारीत दिसून आले. एपीआय सपकाळ हे सिव्हिल ड्रेसवर एकटेच असल्याने व वेळ कमी असल्याने त्यांनी तात्काळ कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे कर्तव्यावरील पोलीस हवालदार सुरेश भोसले तसेच हनुमान मंदिर सर्कल येथील वाहतूक पोलीस हवालदार बिन्नर यांना संशयित इसम पकडण्यास मदत करण्याची विनंती केली.

प्रसंगावधान राखून पोलीस हवालदार भोसले दादर वाहतूक विभागाचे 1) पो. ह. क्रमांक श्री तुकाराम बिन्नर, 2) पो.ह. क्रमांक श्री सुरेश भोसले, 3) पो. ह. क्रमांक सुधाकर पाटील यांनी प्रसंगावधान राखून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीतास पकडून ही कामगिरी केलेली आहे.