परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क-शहरातील वैजनाथ गल्ली येथील रहिवाशी श्रीमती सुशिलाबाई बाबुराव कुकडे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या 82 वर्ष वयाच्या होत्या.
श्रीमती सुशिलाबाई बाबुराव कुकडे रा वैद्यनाथ गल्ली यांचे सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती सुशिलाबाई कुकडे या अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने सर्व परिचित होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमात त्या सहभागी होत असत.
सतीश व पुरुषोत्तम कुकडे यांच्या त्या मातोश्री होत. शिवसेनेचे नेते संजय कुकडे, प्रवीण कुकडे यांच्या त्या काकू होत.
