🔹 सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली, डॉ. बिंदेश्वर पाठक यांना 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
🔹 डॉ. पाठक यांनी 1968 मध्ये प्रथम डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध लावला
नवी दिल्ली/सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक पद्मभूषण बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी दिल्लीच्या एम्समध्ये निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. सकाळी सुलभ इंटरनॅशनलच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. बिंदेश्वर पाठक वैशाली, बिहारचे रहिवासी होते.बुधवारी सकाळी 7 वाजता दिल्लीतील महावीर एन्क्लेव्ह येथील सुलभ गावात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्लीतच हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले जातील.
बिंदेश्वर पाठक यांनी 1968 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहार गांधी शताब्दी उत्सव समितीच्या भंगी-मुक्ती (सफाई कामगारांची मुक्ती) सेलमध्ये सामील झाले. भारतातील मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग समुदायाच्या दुर्दशेबद्दल त्यांनी माहिती समोर आणली. या समाजाची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 1970 मध्ये सुलभ इंटरनॅशनलची स्थापना करून नागरिकांना स्वच्छ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांची संस्था मानवी हक्क, पर्यावरणीय स्वच्छता,घेतला. त्यांची संस्था मानवी हक्क, पर्यावरणीय स्वच्छता, उर्जेचे अपारंपरिक स्त्रोत, कचरा व्यवस्थापन आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.
वृंदावन, यूपी 2012 मध्ये विधवा महिलांसाठी सुलभ शौचालये बनवली.
1968 मध्ये डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध लावला भारतातील मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगच्या प्रथेविरुद्ध मोहीम राबवणाऱ्या बिंदेश्वर पाठक यांनी देशातील स्वच्छता मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील शौचालय बांधकाम या विषयावर त्यांनी बरेच संशोधन केले. डॉ. पाठक यांनी 1968 मध्ये प्रथम डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध लावला, तो कमी खर्चात घराभोवती मिळणाऱ्या साहित्यापासून बनवता येतो. हे पुढे सर्वोत्कृष्ट जागतिक तंत्रज्ञानांपैकी एक म्हणून ओळखले गेले. त्यांच्या सुलभ इंटरनॅशनलच्या मदतीने देशभर सुलभ शौचालयांची साखळी स्थापन केली.