
फाउंडेशन स्कूलमध्ये अधिकार प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
बीड/परळी-वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क- येथील नामांकित इंग्रजी माध्यमाची फाउंडेशन स्कूल येथे दि. 15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना ‘अधिकार प्रदान समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशन परळीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व पत्रकार इंजि.भगवान साकसमुद्रे लाभले होते. श्री चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट संचलित फाउंडेशन स्कूलचे निर्माणकर्ते तसेच अध्यक्ष विजय प्रकाशजी तोतला यांनी विद्यार्थ्यांमध्ये अश्या उपक्रमातून नेतृत्व गुण वृध्दींगत होतो .आम्ही रेसनान्स , कोटा राजस्थान आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस नॉलेज पार्टनर आहोत व आमच्या शाळेत विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, नीट, आयआयटी , जे ई ई.याची बेसिक तयारी केली जाते असे विजय तोतला म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना चाऊस म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अँड्रॉइड मोबाईलचा वापर टाळावा व त्या ऐवजी वेगवेगळी पुस्तके वाचून आपली वाचन कक्षा रुंदवावी . तसेच आपले शरीर बळकट करण्यासाठी मैदानी खेळ खेळावेत असेही ते म्हणाले.
या उपक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रविकुमार तोतला व शैक्षणिक संचालिका सौ. रितू तोतला मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले. माध्यमिक प्राचार्य सुरेश नायर व प्राथमिक प्राचार्य गजानन नागझरे यांनी हा उपक्रम सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वी रित्या पार पडला. यावेळी पो .कॉ.भगवान चव्हाण, पो.कॉ.शंकर डोंगळे,शिक्षक,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

