प्रा.एच.पी.गित्ते यांच्या पुण्यस्मरणा निमित्त सन्मान कर्तृत्वाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-  पी गित्ते यांच्या १२ व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित सन्मान कर्तृत्वाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी  संपन्न झाला.जोग शिक्षण संस्था आळंदीचे अध्यक्ष केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते आणि बंकटराव कांदे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉ प्रितम मुंडे यांनी दुरध्वनी द्वारे पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रा एच पी गित्ते यांना त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण केली.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर डॉ सतीश गुट्टे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, प्राचार्य डॉ रमेश राठोड, संभाजीनगर पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, जेष्ट पत्रकार सतीश बियाणी, संजय खाकरे, अॕड दत्तात्रय आंधळे, प्रकाश सुर्यकर, वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल चाटे, मोहन व्हावळे, श्रीकृष्ण मोती यांना सन्मान कर्तृत्वाचा विशेष कार्य गौरव पुरस्कार स्मृती चिन्ह, गमजा, तुळशी वृंदावन देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सतीश मुंडे, सुरेश माने ,प्रदिप कुलकर्णी, मारोतराव फड, वैजनाथ सानप, इंदुमती गित्ते, रवी कांदे,सुंदर मुंडे उपस्थित होते. सर्वांचे स्वागत हरि सुख प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेश गित्ते यांनी केले.याच सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी तसेच देशसेवा करून भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेले भारतीय सैनिक बेलंबा गावचे सुपुत्र महादेव बाबुराव गित्ते, बंडु देवीदास लांडगे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्ताविक व आभार प्रदर्शन हरि सुख प्रतिष्ठान चे संचालक प्रा अजय गित्ते यांनी केले.