सोनिया-प्रियांकां गांधीनी वीरभूमीवर वाहिली श्रद्धांजली;

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 79वी जयंती आहे. यावेळी सोनिया गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांनी वीरभूमी या त्यांच्या समाधीवर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल उपस्थित होते.

राहुल गांधी नी लडाख मध्यें  प्यागोंग त्सो सरोवराच्या काठावर त्यांनी वडिलांच्या फोटोला पुष्प अर्पण केले. राहुल गांधी  एका पोस्टमध्ये म्हणाले- पापा, तुमच्या खुणा माझा मार्ग आहे. काँग्रेस राजीव यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरा करते.वडिलांच्या आठवणीत राहुल भावुक याप्रसंगी राहुल गांधींनी सोशल मीडियावर लिहिले – पप्पा, तुमच्या डोळ्यातील भारतासाठीची स्वप्ने या अनमोल आठवणींतून ओसंडून वाहत आहेत. तुमच्या खुणा हा माझा मार्ग आहे – प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्ने समजून घेतोय, भारत मातेचा आवाज ऐकतोय.