श्रावण मासानिमित्त मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी.

मोठा पोलीस बंदोबस्त

बीड/परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क– श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे नगरीत देवस्थान ट्रस्टच्यावतीने मोठी तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे चे नजर असून भाविकांसाठी दर्शन सुलभ व्हावे म्हणून बॅरेकेट, महिला आणि पुरुष व पास धारकांची विशेष अशी तीन दर्शन रांगेची सुविधा आहे. गुरुवार पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.

दरम्यान मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई ने सजवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी होणाऱ्या संभाव्य गर्दी पूर्वीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तांनी नियोजपूर्वक प्रवास आखणी केलेली दिसून येत आहे .
माञ अगोदरच शुक्रवार सकाळ पासूनच शहरात शेजारील कर्नाटक, तेलंगणा, गुजरात राज्यातून खाजगी बस, चारचाकी वाहनाद्वारे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.
भाविक भक्तांची मोठी गर्दी परळी वैद्यनाथ नगरीत होईल अशी अपेक्षा आहे.२१ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे. सोमवारी श्री दर्शनासाठी रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्ट ने ही मोठी तयारी केली आहे.