लाखो भाविकांनी घेतले प्रभु श्री वैद्यनाथा चे दर्शन.

बीड/परळी वैद्यनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क : द्वादश ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी ओम नमो शिवाय, हर हर महादेव असा एकच गजर करत वैद्यनाथाचे दर्शन घेतले. राज्यभरातून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसर गजबजलेला होता.

पहिला सोमवार असल्याकारणाने मंदिरात मोठी गर्दी होणार हे ओळखून बऱ्याच भाविकांनी रविवारी दुपार पासूनचं दर्शनासाठी गर्दी केली. मध्यरात्रीपासूनच ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैजनाथच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.सोमवारी गर्दीच्या वेळी दर्शनासाठी सुमारे दोन  तास लागत होते . श्रावण मासानिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
……………………………………………………………….

पर्यटक,भाविकांची गर्दी लहान मोठ्या व्यवसायासाठी आधार

हा श्रावण महिना मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या खेळणी, बेलपत्री- फुल, चहा -नाश्ता अशा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी साठी महत्त्वपूर्ण आधार होणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारी ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिर, परिसर आणि तालुक्यातील इतर अनेक छोट्या मोठ्या शिव मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती.