सोलापूर/ एम एन सी न्यूज नेटवर्क- स्वकुळसाळी (विणकर) समाजाचे आद्य वस्त्रनिर्माता भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव व नामसंकिर्तन सप्ताह सोहळ्याचा प्रारंभ स्वकुळसाळी (विणकर) समाज सोलापूर ज्ञातीचे विठ्ठल मंदिर बेगम पेठ, विजापूर वेस सोलापूर, स्वकुळसाळी (विणकर) स्वकुळसाळी (विणकर) समाज ज्ञातीचे विठ्ठल मंदिर, २०/२१, बेगम पेठ, विजापूर वेस जवळ, सोलापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भगवान श्री जिव्हेंश्वर जन्मोत्सव उत्सव समिती चे अध्यक्ष श्री. गिरीष गुळेद,यशवंत एकबोटे, सचिन चिल्लाळ, दिपक ढगे, ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोमवार २१/०८/२०२३ रोजी सकाळी ७ वा संपन्न झाले.
तसेच दिप पूजन ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन यशवंत एकबोटे, संतोष उकरंडे, दत्तात्रेय क्षीरसागर महाराज, श्री. परमेश्वर गदगे व चंद्रशेखर टोणपे सर नेमिनाथ हेमाडे शिवाजी काका सरवदे, सिद्राम गुळेद श्री व सौ जयहरी काका यांच्या शुभहस्ते विणा पूजन, तसेच टाळ मृदंगाच्या पूजनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला तरी कृपया सर्व स्वकुळ साळी समाज बांधव यांनी दैनंदिन कार्यक्रमास उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असें आवाहन करण्यात आले आहे.