फोटोग्राफी स्पर्धेत सौ. संजीवनी राम भाले प्रथम

🔷 बेबी मॅजिक “च्या संचालिका सौ. संजीवनी भाले प्रथम पुरस्काराने सन्मानित

बीड/परळी वैजनाथएम एन सी न्यूज नेटवर्क – परळी वैजनाथ शहरात अगदी काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या आणि अल्पावधीत ग्राहकांची मने जिंकलेल्या, *Babymagic studio* या फक्त नवजात शिशु व लहान बालकांच्या फोटोसाठीच सुप्रसिद्ध असलेल्या स्टुडिओच्या संचालिका सौ. संजीवनी भाले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नुकत्याच झालेल्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील AWPD फाउंडेशन द्वारा आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत सौ. संजीवनी भाले यांनी काढलेल्या फोटोला New Born Baby या वैशिष्ट्यपूर्ण विभागात संपूर्ण राज्यभरातून आलेल्या फोटो मधून प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

फोटोग्राफीच्या क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करणारे भाले फोटोग्राफीचे श्रीराम भाले यांच्या संजीवनी भाले या पत्नी असून परळी शहरातील प्रथम महिला फोटोग्राफर ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे कालच या स्टुडिओने आपल्या Baby magic studio ची वेबसाईट लॉन्च केली आहे. त्यांनी मिळवलेल्या या पुरस्काराने परळीची मान फोटोग्राफीच्या क्षेत्रात निश्चितच उंचावली आहे . परळीतील फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.