मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्ह्यातील सर्व तालुका निमंत्रक व समन्वयक या पदाची घोषणा
बीड/ परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्ह्यातील सर्व तालुका निमंत्रक व समन्वयक या पदाची घोषणा बीड जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्तात्रय अंबेकर व समन्वयक अभिमन्यू घरत यांनी केली असुन सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख सर, किरणजी नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील पत्रकारांची मात्र संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख यांनी राज्यातील पत्रकारावर होत असलेल्या वाढत्या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवण्या साठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्धार केलेला असुन याच संकल्पने मधून हल्ला विरोधी कृती समितीच्या बीड जिल्हा निमंत्रक पदी दत्तात्रय अंबेकर तर समनव्यक पदी अभिमन्यू घरत यांची निवड केली व त्यांना प्रत्येक तालुका स्तरावर निमंत्रक व समन्वयक नियुक्त करण्याच्या सूचना केल्या.
या सूचना व आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधून बीड जिल्ह्यात परिषद आणखी बळकट कशी करता येईल हे उद्दिष्ट समोर ठेऊन तालुका हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक व समन्वयक यांची निवड करण्यात आली असुन ही निवड पुढील 2 वर्षा साठी असणार आहे. परळी वैजनाथ तालुक्यासाठी जगदीश भारतराव शिंदे (निमंत्रक) व आत्मलिंग प्रभुअप्पा शेटे (समन्वयक) यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख सर, किरणजी नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सह मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ सदस्य व अधिस्वीकृती समितीचे विभागीय सदस्य अनिल महाजन, डिजिटल मीडिया राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे विभागीय संघटक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र बरकसे, जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी, जिल्हा कोषाध्यक्ष छगन मुळे, बीड जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे, दिलीप झगडे, चंद्रकांत राजहंस, अविनाश कदम, जुनेद बागवान, सय्यद शाकेर, गौतम बचुटे ,परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.