जय भोले च्या गजरात मंदिर परिसर चैतन्यमय !

🔷 गायत्री कावड मंडळाचे परळी शहरात जंगी स्वागत

बीड/ परळी वैद्यनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क- गायत्री कावड मंडळ परळी वैजनाथ यांनी 2014 पासून गायत्री कावड संघ कावड अनाण्यासस सुरुवात केली असून प्रतिवर्षी विविध गंगास्थान येथून कावड आणत यावर्षी पुष्प सातवे खडका येथून परळी वैजनाथ ला कावड आणण्यात आली परळी शहरात येताच विविध ठिकाणी कावडी यांचे स्वागत करण्यात आले.
गेल्या सहा वर्षापासून गायत्री कवड्यांनी रविवारी रात्रभर चालत परळीला सोमवारी पहाटे पोहोचून प्रभू वैद्यनाथास कावड जल अर्पण करत यावर्षी संघाने रात्री न जाता दिवसा प्रवास करत रविवारी पहाटे खडका येथे पोहोचून त्या ठिकाणी विधिवत पूजा करत कावड भरून भक्ती भाव भजनात परळीला संध्याकाळी नऊ वाजता पोहोचले यावेळी शहरात विविध ठिकाणी कावडिंचा स्वागत करण्यात आले तसेच यावर्षी कावड मध्ये 45 बांधव उपस्थित असून शहरात बम भोले च्या गजरात मार्केट कमिटी राणी लक्ष्मीबाई टावर या मार्गाने बालाजी मंदिरात थांबून रात्री बारावाजे नंतर सर्वांनी पूजा करत आपापले कावडचे जल घेऊन प्रभू वैजनाथ अर्पण करण्यात आले.

…………………………………………………………………………

कावड भाविकात नाराजीचा सूर हिंदू धर्मातील धार्मिक भक्ती धार्मिक कार्यक्रमांना वाव देण्यासाठी लांब लांबून कावड घेऊन येणाऱ्या कावडींना मात्र देवळ कमिटी कडून जल अर्पण करण्यास कोणतीही सुविधा नाही पास घेऊनच जल अर्पण करण्यास भाग पडत असल्याने कावडी भक्तामध्ये नाराजीचा सूर श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ मंदिरात अलोट गर्दी असते परंतु पाई चालत कावड घेऊन आलेल्या भक्तांना मात्र जलवाहण्यासाठी चक्क पास काढूनच जावे लागत आहे लांबीचा प्रवास करून आलेले कावडी कोणाच्या पायात जखम तर कोणाची प्रकृती खालवलेली असते यासाठी देवळ कमिटीने जलवाहण्यासाठी विशेष सोय केली पाहिजे अशी मागणी कावड संघाकडून केली जात आहे.