सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब, चंद्रावर या भागात उतरणारा पहिला देश देशभरात जल्लोष!

भारताच्या लँडरने 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

श्रीहरीकोटा /चांद्रयान-3 च्या लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. याने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून 25 किमीचा प्रवास 30 मिनिटांत पूर्ण केला. लँडर खाली उतरवण्यात आले.  5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवातीला रफ लँडिंग खूप चांगली झाली. यानंतर लँडरने 5 वाजून 40 मिनीटांनी लॅण्डरने व्हर्टिकल लँडिंग केले. तेव्हा त्याचे चंद्रापासूनचे अंतर 3 किमी होते.चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले आहे.

हा विक्रम रशियाच्या नावावर झाला असता, भारतापूर्वी रशिया चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Luna-25 यान उतरवणार होता. हे लँडिंग 21 ऑगस्ट रोजी होणार होते, परंतु शेवटची कक्षा बदलताना ते मार्गापासून दूर गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.

पंतप्रधान मोदी म्हणाले.. चंदामामा दूर के नहीं, एक टूर के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले- हा क्षण भारताच्या ताकदीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. अमृत काळात अमृताचा वर्षाव झाला. आपण पृथ्वीवर एक प्रतिज्ञा घेतली आणि ती चंद्रावर साकार केली. अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे आपण साक्षीदार आहोत.