ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच दीर्घ आजाराने निधन

दुःखद

मुंबई/ मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  प्रसिद्ध अभिनेते रमेश देव हे त्यांचे पती यांच गेल्याच वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सीमा देव आजारीच होत्या. रमेश आणि सीमा देव सिनेसृष्टीतील आदर्श जोडप मानलं जायचं.

इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.