बीड- शहरात अनधिकरित्या जागोजागी लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्ड, होर्डिंग मुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहरातील अनाधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या विरूध्द ‘बुजगावणे आंदोलन’ करण्यात आले. डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
धुळे ते सोलापूर हा सिमेंट काँक्रेट ने बनलेला असून या राष्ट्रीय महामार्गावर अनेक जागी छिद्र पाडून छिद्र पाडून लावलेल्या लोखंडी कमानीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी आठवडा भरापासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनाधिकृत होर्डिंग्ज व संबंधित प्रकरणात निवेदन देऊन सुद्धा कारवाईस जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या बीड नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि एकूणच जिल्हा प्रशासनाच्या राजकीय दबावापोटी बुजगावण्या भुमिकेमुळे कारवाई करण्यात येत नाही.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्या निषेधार्थ दि.२५ शुक्रवार रोजी बुजगावण्याला हार, नारळ फोडून, डोक्यावर गांधी टोपी व काळे चष्मे घालत जिल्हा प्रशासनाच्या धोरणा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात सुदाम तांदळे,शेख मुबीन,शेख युनुस, मिलिंद सरपते, अजय सरवदे, अशोक येडे, रामधन जमाले, बलभीम कुटे, किष्किंधा पांचाळ, बलभीम उबाळे,आदि सहभागी होते.