बुद्धिबळ विश्वचषक:
बाकू : भारताचा गुणवंत युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानानंदने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसेनला कडवी झुंज दिली. मात्र, टायब्रेकमध्ये प्रज्ञानानंदचे प्रयत्न कमी पडले आणि १.५-०.५ अशा पराभवाने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या कार्लसेनने पहिल्यांदाच विश्वचषकाचा किताब पटकावला.
प्रज्ञानानंदने उपांत्यपूर्व फेरीत भारताचा ब्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीला, तर उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तृतीय स्थानावरील अमेरिकेच्या फैविआनो कारू आला टायब्रेकमध्ये मात दिली होती. या बळावर प्रज्ञानानंदने अंतिम फेरीत धडक मारली होती. माजी जगज्जेत्या कार्लसेनला पारंपरिक पद्धतीच्या दोन्ही डावांत १८ वर्षीय प्रज्ञानानंदने चांगलेच कोंडीत पकडले होते. परिणामी दोन्ही डाव बरोबरी राहिल्याने जेतेपदाचा फैसला टायब्रेकरने ठरवण्यात येणार होता. त्यानुसार गुरुवारी सर्वांचे लक्ष टायब्रेकरच्या खेळाकडे लागले होते. कार्लसेनने टायब्रेकमधील पहिली फेरी जिंकत प्रज्ञानानंदवर मानसिक दडपण निर्माण केले. कार्लसेन टायब्रेकमधील पहिली फेरी जिंकला असला, तरी त्याला प्रज्ञानानंदने.पाच वेळच्या विश्वविजेत्या भारताच्या विश्वनाथन आनंदनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणारा प्रज्ञानानंद भारताचा सर्वात युवा आणि पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.
………………………………………………………..
पंतप्रधानांकडून प्रशंसा
बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपविजेत्या रमेशबाबू प्रज्ञानानंदच्या ऐतिहासिक कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसेनसारख्या तुल्यबळ बुद्धिबळपटूला कडवी झुंज’ देण्यासाठी प्रज्ञाज्ञानंदने उत्कृष्ट कौशल्य दाखवले. बुद्धिबळाच्या पटावर ही काही छोटी उपलब्धी नाही, असे पंतप्रधान त्याची प्रशंसा करताना समाज माध्यमांवर म्हणाले.
………………………………………………………….