गदर 2 ची एकूण कमाई ₹426 कोटी, तर ड्रीम गर्ल चीही सुरुवात चांगली

बॉलिवूड- चित्रपट/मनोरंजन:

गदर-2 चित्रपट सुमारें 4000 (स्क्रीन्स) पडद्यावर वर चालू आहे तरीही त्याचे कलेक्शन नवीन चित्रपटांपेक्षा चांगले आहे.

मुंबई- गदर – 2 ने शुक्रवारी 7.10 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 426.20 कोटी झाले आहे. शनिवारी आणि रविवारी ही कमाई आणखी वाढू शकते.असा सिने तज्ज्ञांचे अंदाज आहेत.सर्वत्रच हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही  चांगल्या पध्दतीने गल्ला गोळा करतो आहे.दरम्यान आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्यामुळे गदर-2 च्या कमाईत काहीशी कमी आल्याचे दिसतं आहे.

बॉलिवूड चित्रपटांनी पुन्हा वेग पकडला बॉलीवूड पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटते. हिंदी चित्रपटांसाठी गेली तीन वर्षे चांगली नव्हती. चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करायची होती, पण उलटे घडत होते.ड्रीम गर्ल – 2 ने देखील चांगले ओपनिंग केले आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुमारें 10.69 कोटी रुपयांची कमाई केली. असून बॉलिवूड सिनेमाला चांगले उत्पन मिळते आहे.

मागील काही महिन्याच्या काळात पठाण ते गदर 2, रॉकी और राणी की प्रेमकहाणी, द केरळ स्टोरी या सर्व चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. आता आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 नेही बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.गदर-2 ची तिसऱ्या आठवड्यात शनीवार,रविवारी कमाईत वाढ होऊ शकते. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले, तरीही त्याची क्रेझ कमी झालेली नाही. हा चित्रपट 4000 स्क्रीन्सवर चालू आहे तरीही त्याचे कलेक्शन नवीन चित्रपटांपेक्षा चांगले आहे.येत्या दोन दिवसांत KGF-2 (हिंदी आवृत्ती) चा विक्रम मोडून गदर – 2 हा तिसरा सर्वात मोठा हिंदी चित्रपट ठरणार आहे. KGF-2 चे आजीवन कलेक्शन रु. 434.70 कोटी होते. बाहुबली-2 आणि पठाणच्या रेकॉर्डपर्यंत पोहोचण्यासाठी गदर-2 ला अजून 100 कोटींची कमाई करावी लागेल.

गदर 2 चे आत्तापर्यंत प्रदर्शित झाल्याच्या 1ल्या दिवशी 40.1 कोटी तर सुमारें पंधराव्या दिवशी 157 कोटी असा चढता आलेख दिसून येतो आहे. आणि एकूणच पंधरा दिवस नंतर एकूण रुपये 426.20 कोटीच ची कमाई केला आहे. जगभरात 535 कोटींहून अधिकचा व्यवसाय गदर 2 ने केला असून ईतर देशातही चांगला व्यवसाय करत आहे. एकूणच चित्रपटाने जगभरात 550 कोटीं पेक्षा अधिक कमाई केली असल्याचे अनुमान निघते आहे.