चांद्रयान ३ मोहिमेतील सहकारी कोकणातील दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव

मुंबई : चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यामुळे भारताने एकप्रकारे इतिहासच रचलेला आहे.रत्नागिरी शहरातील फाटक प्रशालेची माजी विद्यार्थिनी अश्विनी विलास जांभळीकर व संगमेश्वर कुंभार खानी येथील पार्थ अजित सुर्वे  या कोकणातील  दोघांचाही  सहभाग होता.चांद्रयान ३ या मोहिमेच्या टीममध्ये भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली आहे.

रत्नागिरी शहरातील फाटक प्रशालेची माजी विद्यार्थिनी अश्विनी विलास जांभळीकर ही विद्यार्थिनी तर संगमेश्वर कुंभारखानी येथील पार्थ अजित सुर्वे हे दोघेही इस्रोमध्ये काम करीत आहे. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिमानास्पद ठरलेल्या या चांद्रयान ३ मोहिमेतील कोकणवासीय असलेल्या अश्विनी जांभळीकर आणि पार्थ सुर्वे या दोघांचे कोंब फाऊंडेशनचे सतीश सुर्वे, जनार्दन सुर्वे, रमेश सुर्वे, सचिन सुर्वे, शिवाजी शिर्के, हरेष खारकर आदींनी अभिनंदन केले आहे.