• लातूरच्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा समावेश, सहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. • प्रचंड स्पर्धा, • चाचणी परीक्षेत होणारी मार्कचे कमी अधिक टक्केवारी,• जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमध्ये परीक्षा घेण्यास दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
राजस्थान/कोटा- अभ्यासाचे प्रचंड दडपण साप्ताहिक पाक्षिक चाचणी परीक्षेत होणारी मार्कचे कमी अधिक टक्केवारी यामुळे हे विद्यार्थ्यांवर मोठे दडपण येत असून होणाऱ्या परीक्षेतील ग्रेडेशन आणि सततचा अभ्यास या दडपणाखाली कोटा येथील विद्यार्थी दिसून येत आहेत. शिक्षण क्षेत्रात वाढलेली प्रचंड स्पर्धा, गुणात्मक चाचणी परीक्षा आणि मिळून येणारी टक्केवारी यामुळे विद्यार्थी खचत असल्याचेही एक मत पालकाने व्यक्त केल असून चाचण्यातील कमी अधिक टक्केवारीमुळे मुलांचे मानसिक संतुलन खचत असून विद्यार्थ्यांनी धीर धरायला हवा असेही ते म्हणाले. एकूणच देशभरातील अनेक राज्यातून कोटा येथे विद्यार्थी NEET,जेईई च्या तयारीसाठी दाखल होतात. घरापासून दूर एकटाच राहणं, सततचा अभ्यास, अधिक गुण मिळवण्यासाठी पालकांचं-घरच्यांचं, शिक्षकांचं आणि कमी अधिक होणाऱ्या गुणाची टक्केवारी या दडपणाचे ओझ कायम मनावर असल्यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी मोठ्या दडपणाखाली असतात मन मोकळं करायला घरचे कोणीच जवळ नसल्यामुळे ही मुलं मुली अभ्यासाच्या ओझ्याखाली थकून जातात असं एका पालकाने सांगितले.
कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार अजूनही सुरू आहेत. अभ्यासाच्या दडपणाखाली असलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यात महाराष्ट्रातील लातूरच्या एका विद्यार्थ्याचाही समावेश होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमध्ये परीक्षा घेण्यास बंदी घातली आहे. सध्या ही बंदी दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे.
एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, तर दुसऱ्याने फाशी घेतली
पोलिस अधिकारी भागवतसिंह हिंगड म्हणाले की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लातूर येथील 16 वर्षीय आविष्कार संभाजी कासले याने कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोटा येथील तलवंडी भागात अविष्कार 3 वर्षांपासून राहत होता. तो इथे NEET ची तयारी करत होता. रविवारी रस्ता क्रमांक एक येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेसाठी आला होता.तर कुन्डी येथील लँडमार्क परिसरात राहणारा विद्यार्थी आदर्श (18) हा सायंकाळी 7 वाजता खोलीत फाशी घेतलेल्या आढळून आला. आदर्श बिहारमधील रोहिताश्व जिल्ह्यातील रहिवासी होता. विद्यार्थी NEET च्या तयारीसाठी 4 महिने आधीच कोटा येथे आला होता. येथील लँडमार्क परिसरात तो भाऊ आणि बहिणीसोबत फ्लॅटमध्ये राहत होता.
तणाव- पोलिसांनी सांगितले की कोचिंग इन्स्टिट्यूटच्या टेस्टमध्ये आदर्शला सतत कमी मार्क येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. 700 पैकी त्याला फक्त 250 गुण मिळवता आले. याची त्याला काळजी वाटत होती. यामुळे त्याने गळफास घेतल्याचे समजते. एएसपी म्हणाले • आतापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पालक आल्यानंतर खोलीची झडती घेतली जाणार आहे.
चाचणी परीक्षावर बंदी- कोटाचे जिल्हाधिकारी ओपी बनकर यांनी 12 ऑगस्ट रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून कोचिंग ऑपरेटर्सना कडक सूचना दिल्या. रविवारी कोणत्याही चाचण्या घेऊ नये अशा सूचना देऊनही, दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची प्रकरणे रविवारीच समोर आली आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी ओपी बनकर यांनी रविवारी रात्री आदेश जारी केले. या आदेशांनुसार आता कोणतीही कोचिंग इन्स्टिट्यूट दोन महिने मुलांची टेस्ट घेणार नाही. एका दिवसात दोन आत्महत्यांनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. वास्तविक, बहुतेक कोचिंगच्या चाचण्या रविवारी होतात.
• ऑगस्टमध्ये झालेल्या आत्महत्या
• 16 ऑगस्ट : बिहारचा रहिवासी असलेला वाल्मिकी प्रसाद जांगीड (18) जुलै 2022 मध्ये कोटा येथे आला.
• 10 ऑगस्ट : जेईईची तयारी करणारा आझमगड, यूपी येथील रहिवासी मनीष प्रजापती (17) यांने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
• 4 ऑगस्ट : जेईईची तयारी करणारा बिहारमधील मोतीहारी येथील राहणाऱ्या भार्गव मिश्रा ( 17 ) याने रात्री खोलीत आत्महत्या केली. कुलरमध्ये पाणी भरणाऱ्या पाईपने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
• 3 ऑगस्ट: NEET ची तयारी करणारा यूपीच्या रामपूर जिल्ह्यातील रहिवासी मनज्योत छाबडा (18) त्याच्या वसतीगृहाच्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळला. तोंड पॉलिथिनने बांधले होते, दोन्ही हात दोरीने बांधलेले होते.