कुर्टुले आरोग्यासाठी सर्वोत्तम रानभाजी

3 महिन्यातच शेतकरी मालामाल; कुर्टुले लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न
परळी तालुक्यातील शेतकरी तुकाराम मुंडे यांची यशोगाथा
बीड/परळी वैद्यनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क : उत्तम आरोग्यासाठी रानभाजाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. रानभाज्याच्या नियमित सेवनाने आरोग्याचे संवर्धन होते. मात्र अनेक वेळा निसर्गाच्या लहरीपणा शेती विषयक प्रशासनाचा उदास नेतेच धोरण यामुळे रानभाजक दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे मात्र परळी तालुक्यात एका शेतकऱ्याने करटुले यारान भाजीची लागवड करून एक अनोखा उपक्रम राबविला असून त्यातून आर्थिक सुबत्ता मिळवण्याकडे त्यांची वाटचाल चालू आहे. राज्यकर्त्याचे शेती विषयक उदाशीन धोरण यामुळे बळीराजा कायमच संकटात आहे. कर्जबाजारी होत आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन योग्य नियोजन करत वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये केले तर यश नक्कीच मिळते. यात मात्र शंका नाही. परळी तालुक्यातील वानटाकळी येथील एका शेतकऱ्याने कुर्टुले हे रानभाजी पीक घेवून आगळावेगळा प्रयोग आपल्या शेतामध्ये केला आहे. कुर्टुले हे रानभाजी पिकाच्या माध्यमातून  अवघ्या 4 महिन्यातच तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळविले आहे.
कर्टुले ही एक रानभाजी आहे. अत्यंत शक्तीवर्धक व आयुर्वेदिक महत्त्व प्राप्त असलेली कर्टुले ही रानभाजी आहे. या भाजीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी येथील शेतकरी तुकाराम मुंडे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये कर्टुले या रानभाजी चे पिक घेतले आहे. 15 मे 2023 रोजी शेतामध्ये कर्टुले रानभाजी पिकाची लागवड केली. तीन महिन्यांत कर्टुल्याच्या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात ही भाजी तोडणीला येते. आरोग्यदायक, अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याने बाजारात या रानभाजीला मोठी मागणी आहे. बाजारात तीनशे रुपये किलो दराने ही भाजी विकली जात आहे. वानटाकळी येथील शेतकरी तुकाराम मुंडे यांना एका एकरात कुर्टुल्याच्या लागवडीसाठी 25 हजार रुपये खर्च आला आहे. तीन महिन्यात पंधरा क्विंटल कर्टुले अंबाजोगाई व परळी येथील बाजारपेठेत विकले आहेत. सर्व खर्च वजा जाता त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पन्न कर्टुल्याच्या रानभाजीतून मिळाले आहे.
…………………………………………………………..
रानभाजीला परराज्यात मागणी
कर्टुल्याच्या रानभाजीला तेलंगणा, हैदराबाद, विदर्भातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 11 ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने कर्टुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. अत्यल्प कालावधीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी कर्टुले या रानभाजी पिकाकडे वळत आहेत.
……………………………………………………………..
आरोग्यदायी कर्टूलाचे फायदे
चांगली चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या खाण्याकडं अनेकांचा कल असतो. कर्टूलंची भाजी शक्तीवर्धक मानली जाते. त्यामुळे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि कॅन्सर सारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर कर्टुले खाणे कायद्याचे ठरत. तसेच कर्करोगाचा धोकाही कमी होतो. आरोग्याच्या दृष्टीने कर्टुल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची लागवड जगभरात होते. याची लागवड प्रामुख्याने भारतातील डोंगराळ भागात केली जाते. कर्टुलांमध्ये मांसापेक्षा 50 पट जास्त प्रथिने असतात.