बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क :- आद्यवस्त्र निर्माता, शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा परळी वैजनाथ शहरातील संत श्री जगमित्र नागा मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन समस्त स्वकुळ साळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे .
भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दि. 29 ऑगस्ट 2023, श्रावण शुद्ध 13 रोजी संपूर्ण देशभरात श्री भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात,मध्य प्रदेश आदी राज्यातही आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र श्री भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा होत असतो.याच अनुषंगाने परळी शहरातील समस्त स्वकुळ साळी ( विणकर) समाज बांधवांच्या वतीने संत श्री जगमित्र नागा मंदिर येथे सकाळी सहाच्या सुमारास जन्मोत्सव, महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, तदनंतर दुपारी महाप्रसाद, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि सायंकाळी आरती होऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष बालासाहेब पोरे सचिव नितीन भंडारे, विलास ताटे, धनंजय आरबुने, नारायण मानकर, नामदेव आरबुने, शिवाजी मांगलकर, गंगाधर इंगळे, विष्णू लिखे, सुरेश तरटे, नारायण ठोंबरे, संदीप बोनगे, शिवगण, अशोक लिखे, नवनाथ पोरे, श्रीनिवास लटंगे, आदीसह स्वकुळ साळी समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.