फसवणुक/FRAUD
जळगावच्या प्रमोद भाईचंद रायसोनींवर गुन्हा दाखल
जळगाव- व्यसायिक प्रमोद भाईचंद रायसोनी तसेच प्रशांत मणिलाल संघवी (वय- 55, रा. जळगाव) व संदेश मिश्रीलाल चोपडा (वय-54, रा. जळगाव) यांचे वर भोसरी एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचे आर्थिक फसवणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय-53, रा. चिंचवड, पुणे) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार 24 में रोजी भोसरी हद्दीत प्रसन्न गोल्डफिल्डचे कार्यालयात घडला आहे.
सदर आरोपी प्रमोद रायसोनी, प्रशांत संघवी व संदेश चोपडा यांनी एकमेकांशी संगनमत करुन तक्रारदार यांची फसवणुक करण्याचे उद्देशाने भोसरीतील सेक्टर क्रमांक 11 येथील प्लॉट क्रमांक एकवर एकूण क्षेत्र 4400 चौ.मी. या क्षेत्रावर पी 3 डेव्हलर्पस भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रसन्न गोल्डफिल्ड या प्रकल्पातील 62 दुकाने अप्रमाणिकपणे, कपटाने त्यांचे स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली आहे.आरोपींनी अधिकार नसताना दुमारे 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपये किंमतीचा अपहार करुन एकूण 62 दुकाने, ऑफिसेस स्वतःच्या व्यक्तिक फायद्यासाठी स्वतःच्या व्यैक्तिक स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे 11 वेगवेगळया दस्ताद्वारे करारनामा करुन तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी. पोलिस पुढील तपास करत आहे.
तक्रारदार यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्तानचंद कासव, संजय रमणभाई पटेल यांना आगाऊ रक्कम घेवून दुकाने विक्री केली असताना, आरोपींनी 23/5/2023 रोजी 11 वेगवेगळया दस्ताद्वारे करारनामा करुन एकूण 62 दुकाने आरोपींचे स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली आहे. त्यात तक्रारदार यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्तानचंद कासवा, संजय रमणभाई पटेल यांना विक्री केलेल्या 16 दुकानांचा समावेश आहे.